ऑनलाईन टीम/तरुण भारत
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan khan) याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी (durg case) क्लीन चिट मिळाली आहे. या प्रकरणी आर्यन खानविरोधात कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. शुक्रवारी नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने एनडीपीएस कोर्टात आरोपपत्र सादर केले. या आरोपपत्रात आर्यन खानच्या नावाचा समावेश नाही.
मात्र, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना या प्रकरणात दिलासा मिळालेला नाही. या ड्रग्ज प्रकरणात दोघांनाही आरोपी करण्यात आले आहे. अरबाज मर्चंट हा आर्यनचा मित्र आहे. याप्रकरणी आर्यनसह 6 जणांविरुद्ध कोणताही पुरावा सापडलेला नाही. त्यांना क्लीन चिट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एनसीबीचे डीडीजी (ऑपरेशन्स) संजय कुमार सिंग यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आर्यन आणि मोहक वगळता सर्व आरोपींकडे अमली पदार्थ असल्याचे आढळून आले आहे.