ऑनलाईन टीम/ तरुण भारत
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ३ ऑक्टोबर, २०२१ रोजी मुंबई किनारपट्टीवर गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर छापा टाकल्यानंतर अटक केली गेली होती. ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) ही अटक झाली होती. मुंबई हाय कोर्टाकडून जामिन मिळण्याआधी आर्यनला या प्रकरणात २० दिवस जेलमध्ये काढावे लागले होते. पण काही दिवसांपूर्वीच त्याला क्लीन चीट मिळाली. मात्र त्याला त्याचा पासपोर्ट परत देण्यात आला नव्हता. म्हणून आता आर्यनने पुन्हा कोर्टात धाव घेतली आहे. एनडीपीएस (NDPS) विशेष कोर्टात पासपोर्ट परत करण्याची मागणी करणारी याचिका त्याने दाखल केली आहे. (Aryan Khan Update News)
हेही वाचा- पत्राचाळ घोटाळा प्रकरण: संजय राऊत ईडी कार्यालयात दाखल
दरम्यान कोर्टाने यासंदर्भात एनसीबीला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी १३ जुलैला होणार आहे. आर्यन खाननं जामिन देताना लागू केलेल्या अटींचे पालन करत आपला पासपोर्ट कोर्टात जमा केला होता. गुरुवारी ३० जूनला त्यानं आपल्या वकीलांच्या माध्यमातून विशेष कोर्टात एक याचिका आरोपपत्राचा संदर्भ देत दाखल केली त्याच आधारावर पासपोर्ट परत करण्याची मागणी केली.