सावंतवाडी/प्रतिनिधी-
आमदार दिपक केसरकर यांच्या रूपाने तब्बल 35 वर्षानंतर सावंतवाडी तालुक्यातील सुपुत्राला महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याचा मान मिळाला आहे . यापूर्वी 1986 मध्ये शंकर चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात सावंतवाडी माजगाव येथील भाईसाहेब सावंत यांना कॅबिनेट मंत्री पदाचा मान मिळाला होता. भाईसाहेब सावंत यांनी आरोग्य मंत्रीपदासह सतरा विभाग संभाळले हाेते. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दशक्राेशिवार प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली होती. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे जाळे उभारले गेले. सावंतवाडीत भाईसाहेब सावन आयुर्वेद महाविद्यालयाची उभारणी त्यांनी केली होती. भाईसाहेब सावंत यांच्यानंतर सावंतवाडीच्या सुपुत्राला महाराष्ट्राच्या केबिनेटमध्ये स्थान मिळाले नव्हते. केसरकर यांच्या रूपाने ते आता मिळाले आहे.