कुंडल प्रतिनिधी
आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी येत असलेने कुर्बानी न देण्याचा निर्णय कुंडलसह परीसरातील मुस्लिम समाजाने घेतला असून सदर ची कुर्बाणी दुसऱ्या दिवशी देणार असल्याचं कुंडल पोलीस व परिसरातील मोहल्ला कमिटी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. बकरी ईदचा सण असूनही आषाढी एकादशीचे महत्व जाणून मुस्लिम समाजाने घेतलेला हा निर्णय सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.
कुंडल पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशन हद्दितील मोहल्ला कमिटी सदस्य यांच्यात बकरी ईद निमित्त शांतता कमिटी ची बैठक पार पडली यामध्ये मशिदींचे मौलवी तसेच समाजातील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये बकरी ईद ची कुर्बाणी रविवारी न देता ती दुसऱ्या दिवशी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.