वृत्तसंस्था /मुंबई
व्यावसायिक वाहन क्षेत्रातील कंपनी अशोक लेलँडने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 1 लाख 15 हजार मध्यम व अवजड व्यावसायिक वाहन विक्री करत कोरोनापूर्व स्थितीत पोहोचण्यामध्ये यश मिळवले आहे. आगामी काळामध्ये कंपनीला वाहन मागणीमध्ये असाच प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. हिंदुजा समुहाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अशोक लेलँड कंपनीने कोरोनापूर्वी 2017-18 आर्थिक वर्षामध्ये 1 लाख 30 हजार मध्यम व अवजड व्यावसायिक वाहनांची विक्री करण्यामध्ये यश मिळवले होते. कंपनीने यंदा वाहन विक्रीमध्ये चांगली कामगिरी नोंदवली आहे.
15 ते 16 नवी वाहने
आगामी काळामध्ये म्हणजेच आर्थिक वर्ष 2024 मध्ये 15 ते 16 नव्या बस व ट्रक बाजारात उतरवण्याचा इरादाही कंपनीने व्यक्त केला आहे. या तुलनेत 2023 आर्थिक वर्षात कंपनीने 23 नव्या गाड्या दाखल केल्या होत्या. आर्थिक वर्ष 2023 मध्ये मध्यम व अवजड व्यावसायिक वाहनांनी 48 टक्के मागणी वाढीव नोंदवली आहे.
कोठे आहे मागणी
पूर्व आणि उत्तम भारतामध्ये कंपनीच्या वाहनांना ग्राहकांनी जास्त करून पसंती दर्शवली असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. याच भागामध्ये आगामी काळात वाहन विक्रीत अधिक वाढ नेंदवली गेली तर आश्चर्य वाटायला नको, असेही मत कंपनीने वर्तवले आहे.