सर्वसाधारणपणे भारतीयांना स्वत:च्या वारशाबद्दल अत्यंत गर्व असतो, ते उघडपणे जगासमोर त्याचा प्रचार देखील करतात. परंतु प्रत्येक व्यक्तीमध्ये असे करण्यासाठीचा विश्वास नसतो. अमेरिकेत राहणारे अनेक आशियाई-अमेरिक आणि आशियाई स्थलांतरित स्वत:चा वारसा लपवित असतात.
ते स्वत:च्या पार्श्वभूमीचा मोठा हिस्सा म्हणजेच स्वत:च्या सांस्कृतिक प्रथापरंपरा, भोजन, कपडे आणि धार्मिक प्रथा बिगर आशियाई लोकांपासून लपवून ठेवतात. उपहासाची भीती आणि तेथे सर्वांसोबत सामावून घेण्याच्या इच्छेतून ते असे करत असतात. प्यू रिसर्च सेंटरनुसार 5 पैकी एक आशियाई अमेरिकन युवाने स्वत:च्या जीवनात एकेक्षणी बिगर आशियाई लोकांपासून स्वत:ची पार्श्वभूमी लपविली आहे.
अमेरिकेत जन्मलेल्या 32 टक्के आशियाई युवा आणि 15 टक्के बिगर स्थलांतरित युवांनी असे पेले आहे. अमेरिकेत जन्मलेल्या दुसऱ्या पिढीचे 38 टक्के आशियाई प्रौढ आणि तिसऱ्या किंवा त्यानंतरच्या पिढीचे 11 टक्के आशियाई प्रौढ असे करत असतात.
इंग्रजी भाषिकांमध्ये प्रकार अधिक
प्रामुख्याने इंग्रजी बोलणारे आशियाई अमेरिकन लोक सर्वाधिक स्वत:चा वारसा लपवतात. 29 टक्के इंग्रजी बोलणाऱ्या आशियाई प्रौढांनी स्वत:चा वारसा लपविला आहे. 14 टक्के द्विभाषिक आणि 9 टक्के मुख्यत्वे स्वत:ची आशियाई मूळ भाषा बोलू शकणाऱ्यांनी असे केले आहे.
कारण काय?
बिगर आशियाई लोकांपासून स्वत:चा वारसा लपविण्याचे मुख्य कारण लाजिरवाणेपणाची भावना किंवा इतरांबद्दलची कमी जाणीव असणे आहे. स्वत:च्या पार्श्वभूमीला नकारात्मक स्वरुपात पाहिले जाऊ शकते अशी भीती त्यांना सतावत असते. 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे सुमारे 39 टक्के आशियाई युवांनी बिगर आशियाई लोकांपासून संस्कृती, भोजन, धर्म किंवा पोशाखाची पद्धत लपविली आहे. 30-49 वयोगटातील पाचपैकी एक आशियाई व्यक्तीने असे केले आहे.