अर्शद वारसी मुख्य भूमिकेत
सर्वात लोकप्रिय हिंदी वेबसीरिज ‘असूर’चा आता दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. अर्शद वारसी, अनुप्रिया गोयंका आणि वरुण सोबती हे कलाकार असलेली ‘असूर’ सीरिज 2020 मध्ये प्रदर्शित झाली होती. तेव्हापासून चाहते याच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत होते.
‘असूर’मध्ये विज्ञान, धर्म आणि गुन्ह्यांमध्ये अडकलेली गुंतागुतीची कहाणी दर्शविण्यात आली होती. असूर सीरिजमध्ये सीबीआय अधिकारी धनंजय राजपूत म्हणजे अर्शद वारसी, फॉरेन्सिक तज्ञ निखिल म्हणजेच वरुण सोबती अशा व्यक्तिरेखा आहेत. स्वत:ला असूर मानणाऱ्या अन् एका मागोमाग हत्या करत असलेल्या पात्रावर आधारित ही कहाणी आहे. असूर 2 मध्ये आता या कहाणीचा पुढील भाग दर्शविण्यात येणार आहे.
‘असूर 2’ ही सीरिज जियो सिनेमावर एक जूनपासून स्ट्रीम होणार आहे. या सीरिजमध्ये अर्शद वारसी, वरुण सोबती सोबत अनुप्रिया गोयंका, रिद्धी डोगरा, मियांग चेंग, गौरव अरोरा आणि एमी वाघ देखील दिसून येतील.