वार्ताहर/लाटमबारसे
दैनिक पत्राच्या बातमीचा इफेक्ट दिसून आल्यामुळे साळ ते मेणकुरे गावापर्यंत त्या भूमिगत वीज वाहिनी घालण्यासाठी आधुनिक यंत्राद्वारे हॉट मिक्स डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर प्रत्येक 100 मीटर अंतरावर प्रत्येकी दोन – दोन ख•s खोदलेले होते आणि ह्या खोदलेल्या वाहतूकदारांना पावसाळ्यात मोठा परिणाम भोगावा लागला असता वा दुर्घटना घडवून आल्या असत्या त्यामुळे वर्तमानपत्रात आवाज उठवला होता त्याची दखल घेत आज साळमध्ये आधुनिक यंत्राद्वारे डांबरीकरण करण्याच्या कामाला सुऊवात झाली आहे. पावसाळा जवळ आला असून एकदा पाऊस सुरू झाला की हे डांबरीकरण झाले नसते व येथील खड्ड्यांचे रूपांतर आणखी मोठ्या खड्ड्यात झाले असते. येथील वार्ताहराने सदर लोकांच्या मागणीला ताबडतोब वर्तमानपत्र मध्ये प्रसिद्धी दिली नि त्याचा परिणाम म्हणून डांबरीकरण कामकाजाला साळ येथे सुऊवात झाली. खडड्याच्या डांबरीकरणासाठी दिरंगाई झाल्यामुळे लोकात तीव्र नाराजी होती आणि वाहतूकदार संताप व्यक्त करत होते, त्यामुळे लोकांनी आवाज उठवण्यास सुऊवात केली होती. तरी डिचोली चे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटये आणि साळ सरपंच सावित्री घाडी व पंचायत मंडळांनी ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्ष देत योग्य ती पावले उचलली आणि त्यामुळे साळ येथे डांबरीकरणास सुऊवात झाली . त्यासाठी साळ ग्रामवासियांनी आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटये व सरपंच सावित्री घाडी व पंचायत मंडळाचे तसेच दै. वर्तमान चे ही आभार मानले आहे.