शासकीय नोकरीमध्ये बदली व सेवानिवृत्ती या गोष्टी अटळ- सुरेश जाधव
विकास मारुती कांबळे वाहन चालक गेली 33 वर्ष सामाजिक न्याय विभागात कार्यरत होते व सुभाष तुकाराम गायकवाड शिपाई हे गेली 41 वर्ष सामाजिक न्याय विभागांमध्ये कार्यरत होते यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा आज दिनांक 31 मे 2023 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विचार माळ कोल्हापूर या ठिकाणी पार पडला.
विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान होणे ही गरज आहे आपल्या कार्यकर्तृत्वाने जबाबदारीने व कर्तव्यात कसूर न केलेल्या वाहन चालक पदाचा व शिपाई पदाचा दर्जा वाढवण्याचा सत्कारमूर्ती कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. मी माझ्या आयुष्यातील असा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा आज अखेर पाहिलेला नाही. अशा प्रकारचा सत्कार समारंभ सोहळ्याच्या आयोजनाबद्दल श्री .विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांना मनापासून धन्यवाद देत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना एकत्रित केल्याबद्दल विभागाचे कौतुक केले.
शासकीय नोकरदाराच्या आयुष्यामध्ये बदली व सेवानिवृत्ती या गोष्टी अटळ असतात आणि आज सेवानिवृत्त झालेले दोन्ही कर्मचारी यांनी खूप चांगल्या प्रकारे सेवा बजावल्या याबाबत मा. सुरेश जाधव अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर यांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सामाजिक न्याय विभागात कार्यरत असणारे विकास कांबळे वाहन चालक व सुभाष गायकवाड शिपाई या दोघांनीही अनुक्रमाने 33 ते 41 वर्ष निष्कलंक सेवा सामाजिक न्याय विभागाची करून आज नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले हा एक भावनिक व आनंददायी प्रसंग असल्याचे मत मा. उमेश घुले, उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर यांनी केले. याप्रसंगी श्री जयंत चाचरकर ,सहायक आयुक्त, समाज कल्याण सांगली ,श्री दीपक घाटे, समाजकल्याण अधिकारी ,जिल्हा परिषद कोल्हापूर, श्री संतोष चिकने प्रभारी सहायक आयुक्त, सिंधुदुर्ग श्री सचिन साळे संशोधन अधिकारी ,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती बाबत शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केली.
सदर कार्यक्रमांमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विशाल कांबळे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान पार पडले. तसेच श्रीमती सुप्रिया काळे यांची वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पदी व श्री.शीतल करपे यांची प्रमुख लिपिक, समाजकल्याण आयुक्तालय पुणे या ठिकाणी पदोन्नती पदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पाटील, कार्यालय अधीक्षक यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन परब, ,आभार दत्तात्रय पाटील यांनी केले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय विभागाचे वतीने देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन सागर माने यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय कडील, अरविंद रंगापुरे, प्रताप कांबळे, कल्पना पाटील, व कर्मचारी वर्ग तसेच अधिनस्त शासकीय निवास शाळा, शासकीय वस्तीग्रह ,आश्रम शाळा कडील सर्व अधिकारी कर्मचारी वृंद, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर ,जिल्हा समाज कल्याण अधिकारी, विविध महामंडळे, अधिकारी कर्मचारी वृंद,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते बी.व्ही.जी कर्मचारी, उपस्थित होते.