रत्नागिरी / प्रतिनिधी :
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथील कोकण विदर्भ बँक चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आह़े. या प्रकरणी बँक शाखा अधिकारी मनीषा नारायण रेगे (53, ऱा माळनाका रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल़ी असून, पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 20 मार्चदरम्यानच्या काळात चोरट्यांनी करबुडेतील विदर्भ कोकण बँक फोडण्याचा प्रयत्न केल़ा यावेळी चोरट्यांनी बँक कॅश केबीनच्या पुढ्यातील काचा फोडल्या तसेच खिडकीच्या ग्रील पट्टी कापून व वाकवून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल़ा. मात्र, चोरट्यांना बँकेतील रोकड चोरून नेता आली नाह़ी. या प्रकरणी पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी करून कसून तपास करण्यात येत आह़े. विदर्भ कोकण बँकेची करबुडे शाखा ही या परिसरातील एक महत्वाची बँक मानली जात़े. येथे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची खाती या बँकेत आहेत़. तसेच शेतकरी या बँकेतून कर्जप्रकरणे करत असतात़. मागील काही वर्षांपासून या बँकेत चोरी करण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसत आह़े. यापूर्वीही बँकेच्या खिडक्यांची ग्रील तोडून आतील दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होत़ी. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची चोरी करण्याचा प्रयत्न समोर येत असल्याने बँकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े.