फोनवर संपर्क करून वहिनीसोबत अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मित्राची जिवलग मित्राने हत्या केल्याची घटना हुल्यानूर येथे घडली. अभिषेक अप्पाय्या बुड्री (वय 19) असे मृताचे नाव असून हुल्लेप्पा बसप्पा करीकट्टी (वय 23) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
अभिषेक हा फोनच्या माध्यमातून आरोपीच्या वहिनीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. हुल्लेप्पाने त्याला एकदा सावधही केले होते. दरम्यान अभिषेक दुसऱ्या नंबररून त्याचा वहिनीशी जवळीक साधत असताना शनिवार दिनांक 9 रोजी रात्री या दोघांच्यात बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात हुलेप्पाने अभिषेकला चाकूने भोकसले. गंभीर जखमी झालेल्या अभिषेकला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी अभिषेकचा मृत्यू झाला. यासंबंधी मारीहाळ पोलीस स्थानकात प्रकरणाची नोंद झाली असून फरार आरोपी हुल्लेप्पाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे . शहर पोलीस आयुक्त सिद्रामाप्पा, उपायुक्त पी व्ही स्नेहा आणि शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.