1920 हॉरर ऑफ द हार्टचा ट्रेलर प्रसिद्ध
टीव्हीच्या जगतात स्वत:ची दमदार ओळख तयार करणारी अभिनेत्री अविका गौर आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेत्री अविका लवकरच कृष्णा भट्ट यांचा चित्रपट ‘1920 हॉरर ऑफ द हार्ट’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या चित्रपटात अविकाने मुख्य भूमिका साकारली आहे.
2008 मध्ये प्रदर्शित रजनीश दुग्गल आणि अदा शर्मा यांचा चित्रपट ‘1920’ने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता महेश भट्ट यांची मुलगी कृष्णा भट्ट ‘1920 हॉरर ऑफ द हार्ट’ हा चित्रपट घेऊन आली आहे. यात अविका गौर स्वत:च्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांना घाबरविणार आहे. हा चित्रपट 23 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
अविका गोरला तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर तिच्या चित्रपटाची चर्चा सध्या सुरू आहे. अविका गोरने अत्यंत कमी वयात टीव्ही शो ‘बालिका वधू’द्वारे स्वत:ची अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती. यानंतर ती आणखी काही लोकप्रिय टीव्ही शोंमध्ये दिसून आली होती. काही काळापूर्वी अविकाने स्वत:ला ट्रान्सफॉर्म करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.