प्रतिनिधी / बेळगाव
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांच्या कारवरील भगवा ध्वज व नामफलक काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर प्रकाश शिरोळकर यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना पोलिसांनी समन्स बजावले होते. गुरुवारी न्यायालयात उपस्थित राहून त्यांनी जामीन घेतला आहे.
पोलिसांसमोरच कन्नड रक्षण वेदिकेच्या मुठभर कार्यकर्त्यांनी हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. वास्तविक पोलिसांनी त्या कन्नड कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. मात्र शिवसेनेच्या अध्यक्षांवरच गुन्हा दाखल केला. न्यायालयाने आता त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यावतीने
ऍड. शामसुंदर पत्तार यांनी काम पाहिले.