तिरुमाला तिरुपति देवस्थानमकडून निर्मिती
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरच्या मजीन गावत तिरुपति बालाजी मंदिराचे निर्मितीकार्य अंतिम टप्प्यात आहे. हे मंदिर 8 जून रोजी भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. सुमारे 30 कोटी रुपये खर्चून हे मंदिर 62 एकर भूमीवर तयार केले जात आहे. तिरुमला तिरुपति देवस्थानमने जम्मू आणि कटरादरम्यान तिरुपति बालाजी मंदिराची निर्मिती केली आहे. जम्मूमधील हे मंदिर आंध्रप्रदेशबाहेर तयार केले जाणारे सहावे बालाजी मंदिर आहे. यापूर्वी तिरुमला तिरुपति देवस्थानमने यापूर्वी हैदराबाद, चेन्नई, कन्याकुमारी, दिल्ली आणि भुवनेश्वर येथे मंदिरांची निर्मिती करविली होती.
हे मंदिर खुले झाल्यावर जम्मूमधील पर्यटनाला चालना मिळणार आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येत लोक वैष्णोदेवी आणि अमरनाथच्या दर्शनासाठी येत होते. तर भाविकांना आता भगवान वेंकटेशाचेही दर्शन करता येणार आहे. या मंदिराची वास्तुकला अत्यंत सुंदर आहे. हे मंदिर हुबेहुब तिरुपति बालाजी मंदिराच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे.