Kolhapur Robbery News : बालिंगे (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्सवर गुरुवारी दुपारी दरोडा टाकला. या दरोड्यातील दोन संशयित तरुण ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तसेच येत्या दोन दिवसात संपूर्ण प्रकरणाचा छडा लावणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तरुण भारतशी संवाद साधताना दिली.आज दुपारपर्यंत याबाबत अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर बालिंगा येथे पडलेल्या दरोड्यामध्ये LCB पथकाने शोधमोहिम सुरु केली. यामध्ये दोन संशियित ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. गावातीलच प्रतीस्पर्धाने हा दरोडा घातल्याचा संशय आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी शुक्रवारी सकाळी खुपिरे गावच्या हद्दीतील नागरीका स्पिनिंग मिल परिसरात शेतात सापडल्या आहेत. दोन दुचाकी शेतात सोडून चारचाकी गाडीतून दरोडेखोर मुद्देमाल घेऊन दुसऱ्या रस्त्याने कोल्हापूरच्या दिशेने पळून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.