वृत्तसंस्था/ कोलंबो
यापूर्वी फिफाने श्रीलंका फुटबॉल फेडरेशनवर बंदी घातली होती. दरम्यान फिफाच्या बैठकीमध्ये लंकन फुटबॉल फेडरेशनवरील ही बंदी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
21 जानेवरी रोजी फिफाने लंकन फुटबॉल फेडरेशनवर बंदीचा निर्णय घेतला होता. फिफाच्या प्रशासकीय नियमांचे लंकन फुटबॉल फेडरेशनकडून उल्लंघन झाल्याने फिफाने ही कारवाई केली होती. 27 ऑगस्ट रोजी ही बंदी मागे घेतल्याची अधिकृत घोषणा फिफाच्या वरिष्ठ नेत्यांनी केली. आता 29 सप्टेंबर रोजी लंकन फुटबॉल फेडरेशनची निवडणूक होणार आहे.