वार्ताहर /माशेल
बाणस्तारीचा गुरूवार व शुक्रवारचा आठवडी बाजार येत्या गुरूवार 28 पासून नवीन बाणस्तारी बाजार प्रकल्पात भरणार असल्याची माहिती भोम अडकोणचे सरपंच दामोदर नाईक यांनी दिली. मंत्री गोवेंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडयाचा बाजार नुतन प्रकल्पात भरविण्यात येत असून चतुर्थीच्या बाजार आटोपल्यानंतर लगेच नुतन मार्केटमध्ये बाजार भरविण्यात येईल असे सुचविले होते.गुरूवारपासून बाजार सुरू होत असल्याने शेडमध्ये गोव्यातील पारंपारिक व्यापाऱ्यांनाच जागेचे वाटप करण्यात आले आहे. मसाला, बेकरी, इतर व्यवसायिकांना सामावून घेण्यात आले आहे. मार्केट प्रकल्पाच्या बाहेरील जागेत भाजी विव्रेत्यांना तर मोकळ्या जागेत फळविक्रेत्यांना व उरलेल्या जागेत कपडे विक्रेत्यांना जागा देण्यात येईल. प्रकल्पाच्या समोर बांधण्यात आलेली दुकाने मोडून तिथे कपडे विक्रेत्यासाठी सोय केली जाणार आहे. कुठल्याही व्यापाऱ्याला जागा मिळण्यात त्रास होत असल्dयास सरपंचानी आपल्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मार्केटमधील दुकानांचा लिलाव करून दिली जाईल. त्यासाठी खास ग्रामसभा बोलाविण्यासाठी सोपस्कर सुरू आहे. गुरूवार 28 पासून नुतन मार्केट प्रकल्पात बाजार भरविण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच दामोदर नाईक यांनी केले आहे.