प्रतिनिधी
बांदा
बांदा येथील खेमराज हायस्कूल रस्त्यावरील श्री देव म्हारींगण व सतीदेवी मंदिर देवस्थानच्या आवारात मनसे राज्य सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे यांच्या वतीने सौरऊर्जा पथ दिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. यासाठी मनसे माजी विभागप्रमुख मिलिंद सावंत यांनी पुढाकार घेतला.श्री देव म्हारींगण व सतीदेवी मंदिर परिसरात अंधार असतो त्यामुळे दिवाबत्तीसाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होत होती. पथदीप लावण्याची मागणी गेले अनेक दिवस परिसरातील ग्रामस्थांची होती.माजी विभागप्रमुख मिलिंद सावंत यांच्या हस्ते सौरऊर्जा पथदिव्याचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी मनसे जिल्हा संघटक अनिल केसरकर, चिन्मय नाडकर्णी, जय पटेकर, देवस्थान समिती सदस्य आत्माराम बांदेकर, ऋषी कदम, नंदू बांदेकर, भिकाजी जाधव, प्रथमेश धुरी, विष्णु वसकर, सतीश आकेरकर उपस्थित होते.