सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी एसटी आगार आता मुंबईकर चाकरमान्यांसाठी खास बस सेवा सुरू करत आहे. स्लीपर कोच दोन बसेस मुंबई -बोरीवलीसाठी पणजी ते सावंतवाडी बांदा अशी बस सेवा आज 4 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आलेआहेत. अशी माहिती आगार व्यवस्थापक श्री गाबित ,स्थानक प्रमुख श्री शेवाळे यांनी दिली . सध्या पणजी -बोरवली ही बस सायंकाळी सात वाजता बांदा येथून सुटणार आहे. सध्या ही बस बांदा ते बोरवली अशी सुटत आहे. मात्र पुढील काळात पणजी येथून सुटणार आहे. तसेच बांदा ते सेंट्रल मुंबई अशी सायंकाळी ६. ३० वाजता बस सेवा ५ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहे. दोन स्लीपर कोच बसेस मुंबईमध्ये आता धावणार आहेत. त्यामुळे गेली कित्येक वर्षापासून मुंबईमध्ये धावणाऱ्या एसटी बसेस बंद होत्या त्या पुन्हा आता सुरू झाल्या आहेत . अवघ्या बाराशे ते चौदाशे रुपयात ही स्लीपर कोच बस चाकरमान्यांसाठी फलदायी ठरणार आहे.