मुंबई
आठवड्याच्या पहिल्या दिवशी 29 मे रोजी शेअरबाजार खुला होताच निफ्टी बँकेने विक्रमी झेप घेतली. मार्च तिमाहीचे चांगले निकाल पाहता बँक निफ्टी सोमवारी 465 अंकांनी वधारत 44,483 अंकांपर्यंत पोहचला होता.
निफ्टी बँकेचा निर्देशांक सकाळी 0.93 टक्के तेजीसह 44,424 अंकांवर झेपावला होता. याआधी या निर्देशांकाने 15 मे रोजी 44,151 अंकांवर झेप घेतली होती. निफ्टी बँकेच्या सोमवारच्या यशात आयडीएफसी फर्स्ट बँक ही आघाडीवर राहिली होती. वर्षभरात या बँकेचे समभाग 104 टक्के इतके वाढले आहेत. तर जोडीला बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक यांचे समभागही अनुक्रमे 87, 55 टक्के तेजीत राहिले आहेत.