नवी दिल्ली
बँक ऑफ बडोदाने आपल्या गृहकर्ज व्याजदरामध्ये कपात केल्यामुळे ग्राहकांचा आगामी काळामध्ये समान मासिक हप्त्यावरचा ताण काहीसा कमी होणार आहे. बँक ऑफ बडोदाने गृहकर्ज व्याजदर 6.75 टक्क्मयांवरून 6.50 टक्के वर्षाच्या आधारावर घोषित केला आहे. सदरचा नवा व्याजदर हा 30 जून 2022 पर्यंत लागू असणार असल्याचेही बँकेने म्हटले आहे. याच दरम्यान बँकेने प्रक्रिया शुल्कामध्येही सवलत देण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये घरांच्या विक्रीमध्ये वाढ दिसून आली असून त्याचाच फायदा ग्राहकांना व्हावा यासाठी बँकेने व्याजदरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.