1 जूनपासून स्थानिक स्पर्धेत फॉरेनच्या प्लेअर्संना खेळण्यास बंदी; एआयएफएफच्या निर्णयानुसार होणार अमंलबजावणी
संग्राम काटकर कोल्हापूर
गेली 16 वर्षी कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये कौशल्यपूर्ण खेळाने स्पर्धा गाजवून सोडणाऱ्या परदेशी खेळाडूंचा जलवा 1 जून पाहून कोल्हापुरी फुटबॉल शौकिनांना पाहण्यास मिळणार नाही. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने (एआयएफएफ) देशातील सर्व फुटबॉल संघातून परदेशी खेळाडूंना खेळवण्यास मनाई केली आहे. देशातीलच खेळाडूंनाच संघात स्थान दिले जावे, यासह अन्य काही कारणे देत परदेशी खेळाडूंना ही मनाई केली आहे. या मनाईची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार असून त्याचा फटका कोल्हापूरातील वरिष्ठ संघांना सहन करावा आहे. सध्या शाहू स्टेडियममध्ये अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुऊ आहे. या स्पर्धेअंतर्गत 1 जूनपासून होणाऱ्या सामन्यांमध्ये मनाईनुसार परदेशी खेळाडूंना खेळवता येणार नाही. त्यामुळे आता पुढील फुटबॉल हंगामात परदेशी खेळाडू दिसणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे सहाजिकच परदेखी खेळाडूंना 31 मेनंतर संबंधीत संघांना सोडण्याबाबतचे सर्व सोपस्कार पूर्ण करावे लागतील. तसेच यंदाच्या हंगामासाठी संघांतून खेळण्यासंदर्भात केलेल्या करारानुसार मानधनाचा हिशेबही परदेशी खेळाडूंना चुकता करावा लागणार आहे. कोल्हापुरी फुटबॉल हंगाम व परदेशी खेळाडू हे एकप्रकारचे नाते गेल्या 16 वर्षांपासून तयार झाले होते. तत्पूर्वी 1994-95 साली ज्येष्ठ फुटबॉलपटू शिवाजी पाटील यांनी कोल्हापुरातील फुटबॉल स्पर्धेत गोल्डस्टार स्पोर्टस् असोसिएशनकडून फॉरेनर खेळाडू खेळवण्याचा फंडा यशस्वी कऊन दाखवला होता. सुदानी खेळाडू हसन, मोहमद्दीन आणि जोहेल अशी गोल्डस्टारकडून कोल्हापूरातील स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंची नावे आहेत. त्यांनी दर्जेदार खेळ कऊन कोल्हापुरातील अवघ्या फुटबॉल शौकिनांना आपले चाहते कऊन सोडले होते.
2007 पासून परदेशी खेळाडूंना संघांमध्ये स्थान
केएसएचे पेट्रन-इन-चिफ श्रीमंत शाहू छत्रपती यांनी तर 2007-08 साली कोल्हापुरातील वरिष्ठ फुटबॉल संघातून दोन परदेशी खेळाडूंना खेळवण्याचा जणू वटहुकूम काढला. आणि येथूनच खऱ्या अर्थाने कोल्हापुरी फुटबॉलने वेगळी उंची धारण करायला सुऊवात केली. संघांनीही नायजेरियन, सुदान व घाणा येथील शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात येणाऱ्या खेळाडूंशी संपर्क साधत त्यांना संघातून खेळण्याबाबत करारबद्ध करण्यास सुऊवात केली. फुटबॉल स्कीलने परीपूर्ण असलेल्या या परदेशी खेळाडूंमुळे स्थानिक संघ बलाढ्या बनू लागले. संघातून हंगामात खेळल्याच्या मोबदल्यात परदेशी खेळाडूंना मासिक व संपूर्ण हंगाम अशा तत्वावर हजारो ऊपयांचे मानधन संघांकडून दिले जाऊ लागले. 12 वर्षांपूर्वी श्रीमंत शाहू छत्रपती यांनी फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला किमान 50 हजार ऊपये व उपविजेत्या संघाला 30 हजार ऊपये बक्षीस देण्याची व्यवस्था करावी, असे स्पर्धा आयोजकांना आवाहन केले. आयोजकांनी या आवाहनाला आदेश माणत जास्तीत जास्त रोख रकमेची बक्षीसे देण्याला सुऊवात केली. जो संघ बक्षीस जिंकेल त्याची आर्थिक बाजू भक्कम होईल, अशी बक्षीसांची रक्कम वाढण्यामागे श्रीमंत शाहू छत्रपतीची भावना होती. जस जशी बक्षीसांची रक्कम वाढत गेली तसतसे स्पर्धेत जिंकण्यासाठीची चुरस, ईर्ष्या, वादावादी टोकाला गेली. पाटाकडील तालीम मंडळ, गोल्डस्टार स्पोर्टस् असोसिएशन, बालगोपाल तालीम मंडळ, शाहूपुरी फुटबॉल क्लब, फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, प्रॅक्टीस फुटबॉल क्लब, शिवनेरी स्पोर्टस् या संघ व्यवस्थापकांनी तर स्थानिक, नायजेरियन खेळाडू व राष्ट्रीय खेळाडूंची मोट बांधत संघ बलाढ्या केले. या संघात होणाऱ्या सामन्यातील विशेषत: परदेशी खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी शाहू स्टेडियमची प्रेक्षक गॅलरी अक्षरश: भरून जात होती.
परदेशी खेळाडूंमुळे कोल्हापूरी फुटबॉलला आले ग्लॅमर…
सामन्यातील दर्जेदार खेळ आणि सामने पाहण्यासाठी होणारी अलोट गर्दी यामुळे कोल्हापूरी फुटबॉलला ग्लॅमर आले. या ग्लॅमरमुळेच गोवा, केरळ, कोलकाता व पश्चिम बंगाल येथील दर्जेदार फुटबॉलनंतर कोल्हापूरी फुटबॉल ज्वराकडे आदराने पाहिले जाऊ लागले. गेल्या सात-सहा वर्षांपासून कोल्हापुरी फुटबॉलचे सारे चित्र बदलले आहे. संघातून खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंचा दरही काही हजाराच्या घरात गेला. त्यामुळे परदेशी खेळाडू महिन्याला 20 ते 30 हजार ऊपये मानधन संघाकडून दिले जाऊ लागले. नंतर याच मानधनात प्रतिफुटबॉल हंगाम वाढ होत गेली. त्यामुळे मानधन देण्यासाठी संघ व्यवस्थापनाला खूप ओढाताण करावी लागली. मात्र ती सहन करत संघांनी परदेशी खेळाडूंना आपल्या संघातून खेळण्याला प्राधान्य देण्यात कचुराई केली नाही. आपल्या संघातून खेळणाऱ्या परदेशी खेळाडूची गुप्तस्थळी चाचण्यास घेऊन स्कीलनुसार त्यांना घेतले जाऊ लागले. त्यामुळे दरवर्षीच्या फुटबॉल हंगामात कोणत्या संघातून कोणता दर्जेदार परदेशी खेळाडू खेळणार आहे, याची उत्सुकता फुटबॉल शौकिनांना लागून राहत होती. संघही स्थानिक खेळाडूंना कमी आणि परदेशी खेळाडूंवर जास्ती प्रमाणात धनवर्षाव कऊ लागले. सध्या सुऊ असलेल्या हंगामासाठी सर्वच संघांनी परदेशी खेळाडूंना दरमहा 50 ते 80 हजार देऊन आपल्या संघातून खेळवले आहे. येत्या 1 जूनपासून मात्र परदेशी खेळाडूंची खेळ थांबणार आहे. सोबत परदेखी खेळाडूंना मानधन देण्यासाठी संघांना करावी लागणारी आर्थिक ओढाताणही थांबणार आहे. ही ओढाताण थांबली असली तरी आता वरिष्ठ संघांना स्थानिक व देशातील खेळाडूंची मोट बांधूनच फुटबॉल हंगामातील स्पर्धा खेळाव्या लागणार आहेत.
एआयएफएफने फुटबॉल संघांमधून परदेशी खेळाडूंना खेळवण्यासाठी केलेली बंदी स्वागताहार्य आहे. या बंदीमुळे स्थानिक फुटबॉल संघांमधून स्थानिक खेळाडूंना खेळण्याची आणि स्कील दाखवण्याची संधी मिळणार आहे. परदेशी खेळाडू मैदानातील ज्या प्लेसवर खेळत होता, त्या प्लेसवर स्थानिक खेळाडूला खेळवले जात नव्हते. आता असे होणार नाही. तेव्हा आता स्थानिक खेळाडूंनी मरगळ झटकून सरावात स्वत:ला झोकून द्यावा. मालोजीराजे छत्रपती (अध्यक्ष : केएसए)
परदेशी खेळाडू व त्यांच्या खेळावर कोल्हापूरी फुटबॉल शौकिनांनी मनापासून प्रेम केले. हजारो शौकिन त्यांचे चाहतेही झाले. संघ व्यवस्थापनांही परदेशी खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे मानधन देण्यात हात आकडता घेतला नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य परदेशी खेळाडूंनी सामन्यात उत्तम खेळ करत फुटबॉल शौकिनांची मने तर जिंकलीच, शिवाय संघांना विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
बाबूराव पाटील (प्रशिक्षक : बालगोपाल तालीम मंडळ)