चिमुकलीने विचारला गोंडस प्रश्न
गणेशोत्सवामुळे सध्या सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. या उत्सवाशी निगडित अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गणेशोत्सवासाठी काही लोकांनी घरीच गणपतीची मूर्ती हाताने साकारली आहे. अशाच घरी साकारलेल्या एका मूर्तीसोबत एक चिमुकली गोड संवाद साधतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चिमुकली बाप्पासोबत मनमोकळेपणाने बोलताना दिसून येते. या व्हिडिओत चिमुकली बाप्पाच्या मूर्तीसोबत बसल्याचे दिसून येते. गणपतीची मूर्ती घरीच हाताने साकारण्यात आली होती. मूर्तीचे रंगकाम अद्याप पूर्ण झाले नव्हते. व्हिडिओत चिमुकली गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे पाहून ‘तुला लाडू आवडतो? लाडू? देऊ का असे विचारताना दिसून येते. तसेच ती गणपती बाप्पाला बोलण्याचा आग्रह करताना म्हणते, ‘गुरु ब्रह्मा बोल.. गुरु ब्रह्मा बोल आधी’. तसेच ही चिमुकली मूर्तीच्या पाया पडते आणि बाप्पाकडे बरेच काही मागते. बाप्पा सुखी ठेव, बुद्धी दे, मोठ्ठ कर.. असे ती म्हणत असतानाचा हा व्हिडिओ पाहून कुणीही भारावून जाईल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. निरागस प्रेम असे एका युजरने म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरने सुखी ठेव बाप्पा या चिमुकलीला अशी कॉमेंट केली आहे. या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळत आहे.