मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खाच-खळग्यातून आदळत, आपटत आणि कोकण रेल्वेतून चेंगराचेंगरीत प्रवास करत कोकणातील गावांगावात दाखल झालेला चाकरमानी रविवारी घरगुती गणेश विसर्जनानंतर दरवर्षीप्रमाणेच असह्या वेदना झेलत परतीच्या प्रवासाला लागला आहे. महामार्ग वाहतूककोंडीने जाम, तर कोकण रेल्वे गर्दींने फुल्ल होणे हे नित्याचेच झाले आहे. आणखी किती काळ या वेदनांचा प्रवास सुरू राहणार हे सांगता येत नसले तरी बाप्पा पुढील वर्षी तरी प्रवास सुखकर होऊ दे असा आर्जव परतीला लागलेला चाकरमानी करताना दिसत आहे.
गणेशोत्सव आणि शिमगोत्सव हे कोकणातील महत्त्वाचे सण. मात्र या दोन्ही सणापैकी सर्वाधिक गणेशोत्सवाला दरवर्षी रत्ना†गरी, रायगड आा†ण सिंधुदुर्ग ा†जह्यात लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावाला येतात. यावर्षी 19 सप्टेंबरला गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. कोकणातील गणेशोत्सवाला मुंबई, पुणेकर चाकरमान्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. कधी नव्हे तो चाकरमान्यांच्या गर्दीचा उच्चांक गाठला गेला. कोकणात एरव्ही सुनी-सुनी असलेली गावे आणि कुलूपबंद असलेली घरे या उत्सवाच्या निमित्ताने गेली आठवडाभर गजबजून गेली होती. कोकणात सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असल्याने शहरांपेक्षा गावोगावच्या उत्सवात एक वेगळाच उत्साह पहायला मिळतो. कामानिमित्त मुंबईसह इतर शहरांत असणारे चाकरमानीच नव्हे, तर देश-विदेशातूनही अनेकजण आपल्या गावी आल्याने या उत्सवाला इतर सणांपेक्षा एक वेगळाच रंग यावर्षी चढलेला दिसला.
दरम्यान, घरगुती गणपतीचे रविवारी दुपारनंतर विसर्जन झाल्यानंतर गावाला आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. एस. टी. बसेस, खासगी वाहनांनी मुंबई-गोवा महामार्ग रविवारी सायंकाळपासून गजबजून गेला आहे. महामार्गाचे काम ठिकठिकाणी अर्धवट असल्याने वाहनांच्या रांगाच्या रांगा पहायला मिळाल्या. कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात गाड्या सोडल्याने रेल्वे स्थानके, तसेच एस.टी. महामंडळानेही परतीच्या प्रवासासाठी अधिकाअधिक बसेस सोडल्याने एस.टी. बसस्थानके चाकरमान्यांच्या गर्दीने तुडूंब भरून गेली आहेत. याचबरोबरच ज्यांना आरक्षण मिळाले नाही त्यांनी खासगी वाहनांकडे मोर्चा वळवल्याने तेथेही गर्दी पाहायला मिळत आहे. यातच खासगी वाहतूकदारांनी अव्वाच्या सव्वा दर आकारून चाकरमान्यांची लूट सुरू केली आहे. मात्र तरीही या सर्व समस्येतून मार्ग काढत चाकरमानी आपले घर गाठताना दिसत असल्याचे चित्र कोकणात सर्वच तालुकास्तरावर दिसत आहे. कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या बारा वर्षांपासून रखडले आहे. पेणपासून सिंधुदुर्गपर्यंत चौपदरीकरणाचे काही टप्पे पूर्णत्वास गेलेले असले तरी रखडलेल्या टप्प्यांमध्ये पावसाळ्यात पडणारे ख•s दरवर्षी गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांना तापदायक ठरत आले आहेत. दरवर्षीची ही बोंब आहे. यावर्षी गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांना महामार्गची एक मार्गिका सुरू करण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एक नव्हे, दोन नव्हे तब्बल नऊ दौरे महामार्ग पाहण्यासाठी काढले. त्यातून थोड्याफार प्रमाणात का होईना दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी थोडासा का होईना दिलासा मिळाला. गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना किरकोळ अपवाद वगळला तर फारसे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले नाही.
रविवारी गणेश विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरवर्षी ज्या कशेडी घाटात अडचणींचा सामना चाकरमान्यांना करावा लागतो त्या घाटात यावेळी मुंबईकडून येताना पर्याय म्हणून नव्याने काढण्यात आलेल्या कशेडी बोगद्यातून हलकी वाहने सुरू केल्याने दिलासा मिळाला. मात्र हा प्रयोग मुंबईकडे जाताना का केला नाही याचे कोडे उलगडताना दिसत नाही. मुंबईकडे जाताना हलकी वाहने बोगद्यातून सोडली गेली असती तर घाटातील त्रास कमी झाला असता. येथे कुठेतरी कोकणातील लोकप्रतिनिधी कमी पडल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे परतीच्या प्रवासाला निघालेले चाकरमानी मनोमन प्रार्थना करत आहेत. दरवर्षीच्या या ख•sमय प्रवासाला आता आम्ही कंटाळलो आहोत, पुढील वर्षी तरी येताना महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होऊन आमचा प्रवास सुखकर कर, असे बाप्पाला साकडे घालत आहेत. मुळातच कारणही आता तसेच आहे. रेल्वे, एस.टी. बसचे आरक्षण मिळत नाही, मिळेल त्या वाहनाने गर्दीत जायचे तर वृध्दांना रस्त्यांवरील ख•dयांमुळे घरी आणता येत नाही. त्यामुळे चौपदरीकरण पूर्ण झाले तर सहकुटुंब, सहपरिवार अधिक उत्साहाने गणेशोत्सव साजरा करता येईल, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. महामार्गानंतर दुसरा पर्याय म्हणजे कोकण रेल्वेचा. तसे पाहिले तर रायगडनंतर रेल्वेचा पुढील सिंधुदुर्गपर्यंतचा प्रवास हा सिंगल ट्रॅकचा आहे. तरीही कोकण रेल्वे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सिंगल टॅक असूनही क्षमतेपेक्षाही अधिक गाड्या सोडत आहे. प्रसंगी सुटणाऱ्या गाड्यांना डबेही वाढवत आहे. मात्र कोकणात उत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांची संख्याच दिवसेंदिवस वाढत असल्याने सोडलेल्या गाड्याही कमी पडताना दिसत आहेत. प्रचंड चेंगराचेंगरीचा हा प्रवास खरंच या चाकरमान्यांनीच सहन करावा. अन्य कुणालाही ते जमणे अशक्य आहे. सिंधुदुर्गातच चाकरमान्यांनी गाड्या फुल्ल होत असल्याने परतीच्या प्रवासात रत्नागिरी जिल्ह्यात डब्यांचे दरवाजेच उघडले जात नाहीत. परिणामी संतप्त प्रवाशांच्या उद्रेकाचा सामना रेल्वे प्रशासनाला करावा लागतो. रविवारी खेड रेल्वे स्थानकात अशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले.
एकूणच कोकणातील गणेशोत्सव असो अथवा शिमगोत्सवासारखे कोणतेही सण असोत, चाकरमान्यांचा प्रवास तितकासा सुखकर नाहीच आणि विशेष म्हणजे कोकणातील नेतेमंडळींनाही कुणाचे काही पडलेले नाही. कोकणी माणूस आता या रखडलेल्या महामार्ग आणि येथील राजकीय नेतृत्वावर प्रचंड नाराज आहे. एकापेक्षा एक नेतेमंडळींची फळी कोकणात असतानाही कोकणचा एकमेव महामार्ग एवढी वर्षे रखडला याचेच त्यांना आश्चर्य वाटते. विकासाबाबत लांबलचक भाषणे ठोकणारी नेतेमंडळी महामार्गाबाबत थंड का पडतात याचे कोडे त्यांना सुटलेले नाही. रायगडमधील सर्वेसर्वा सुनील तटकरे सध्या खासदार आहेत. कोकणचे भाग्यविधाते म्हणूनही कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहतात. त्यांची कन्या आदिती तटकरे या मंत्रीमंडळात आहेत. महाडमध्ये गेली अनेक वर्षे आमदार असलेले शिवसेनेचे भरत गोगावले सध्याच्या सरकारमध्ये शिंदे गटाचे प्रतोद आहेत. पुढे अनंत गीते, भास्कर जाधव हे शिवसेनेचे नेते आहेत. उदय सामंत हे सध्या उद्योगमंत्री आहेत. शिवसेना नेते रामदास कदम, विनायक राऊत, उपनेते राजन साळवी, मंत्री दीपक केसरकर यासह वरील सर्व राजकीय नेतेमंडळी गेली 25 ते 30 वर्षे कोकणच्या राजकारणात सक्रीय आहेत. मात्र या सर्वांना रखडलेल्या महामार्ग चौपदरीकरणाची कोंडी गेल्या 12 वर्षात फोडता आलेली नाही हेच कोकणचे दुर्देव आहे.
राजेंद्र शिंदे