वृत्तसंस्था/ मुंबई
येथे झालेल्या 27 व्या बापुना चषक टी-20 स्पर्धेत मुंबई संघाने अंतिम सामन्यात विदर्भच्या दिनशॉ इलेव्हन संघाचा 11 धावांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकात 158 धावा जमवल्या. हार्दिक तेमोरेने 32 चेंडुत 6 चौकारांसह 47, दिव्यनेश सक्सेनाने 24 चेंडुत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 30, प्रसाद पवारने 14 चेंडुत 4 चौकारांसह 24 धावा जमवल्या. विदर्भतर्फे रजनीश गुरबानीने 12 धावात 3 गडी बाद केले. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना विदर्भ दिनशॉ इलेव्हन संघाने 20 षटकात 6 बाद 147 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 11 धावांनी गमवावा लागला. दिनशॉ संघातील सिद्धेश वेथने 39 तर रामस्वामीने 32 धावा जमवल्या. मुंबईतर्फे तुषार देशपांडेने 27 धावात 3 गडी बाद केले.