सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि सामाजिक कार्यकर्ते विनीत जिंदाल यांनी शुक्रवारी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) या संस्थेविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावरील डॉक्युमेंटरी (Documentory) विरोधात तक्रार दाखल केली आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये 2002 साली झालेल्या गुजरात दंगलीमुळे (Gujrat Roits) हिंसाचार उसळल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भुमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
पेशाने वकिल असलेल्या विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी ट्विटरवर पोस्ट टाकताना लिहिले आहे की, “देशातील जनतेने पंतप्रधान मोदींना निवडले असून आपल्या देशात घटनात्मक सरकार आहे. बीबीसी न्यूजचे हे कृत्य म्हणजे केवळ भारतातच नाही तर जगभरातील मुस्लिमांना हिंदूंविरुद्ध भडकवण्याचा कट आहे. त्यामुळे ही डॉक्युमेंटरी करणाऱ्य़ा सस्थेविरूद्ध कारवाई करावी.” अशी मागण केली आहे.
यापुर्वी विदेश मंत्रालयाने या डॉक्युमेंटरीचा निषेध करून बीबीसी विऱोधात ब्रिटनच्या सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली होती.