आचरा प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी येणार आहेत.यावेळी वाहतूकीची समस्या किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस पाटलांनी तत्पर राहण्याच्या सुचना आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी बेळणा येथे दिल्या. यावेळी देशासाठी बलिदान देणारे थोर हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या माहिती फलकाचे अनावरण बेळणा चेकपोस्ट येथे त्यांच्या हस्ते झाले.
गणेशोत्सव आणि इदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आचरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारया गावातील पोलीस पाटलांची बैठक बेळणा चेकपोस्ट येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांच्या सोबत आचरा पोलीस स्टेशनचे महेश देसाई, संदीप कांबळे, मिलिंद परब,अभिताज भाबल,पोलीस पाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी, सिताराम सकपाळ, सुनील त्रिंबककर,दिनेश पाताडे, सुर्यकांत घाडी, आनंद तांबे, कदम,संदीप कुवळेकर,चंद्रदिपक मालंडकर,नारायण जिकमडे,तळवडेकर, सिद्धेश राऊत यांसह अन्य पोलीस पाटील, होमगार्ड भावे आदी उपस्थित होते. यावेळी आचरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारया कोईळ गावची एक गाव एक गणपती ही संस्कृती आदर्शवत असल्याचे यावेळी व्हटकर म्हणाले .