शाळांमध्येही समस्येची शंका, मुलांच्या उत्तम विकासासाठी आईवडिलांची साथ आवश्यक
अमेरिकेत दरवर्षी आई आणि वडिल दोघांसोबत राहणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी होत चालले आहे. तेथील जवळपास एक चतुर्थांश मुले एक तर आई किंवा केवळ वडिलांसोबत राहतात. हा ट्रेंड केवळ अमेरिकेपुरती मर्यादित नसून जगभरात वाढत चालला आहे. याचे कारण घरगुती वादापासून विविध ठिकाणी काम करणे असू शकते. सिंगल पॅरेटिंग काही सकारात्मक विकास नाही. केवळ आई किंवा वडिलांसोबत राहणाऱ्या मुलांमध्ये वर्तनासंबंधी समस्या अधिक असतात, असे तज्ञांचे सांगणे आहे.
विशेषकरून शाळेत किंवा कायदा व्यवस्थेप्रकरणी ही मुले अडचणीत सापडण्याची शक्यता अधिक असते. तर ही मुले इतरांच्या तुलनेत कमी गुणवत्तेचे शिक्षण प्राप्त करतात. यामुळे मोठेपणी कमी उत्पन्नाशी निगडितच काम करू शकतात असे तज्ञांनी म्हटले आहे.
आर्थिकदृष्ट्या देखील बहुतांशकरून सिंगल मदर किंवा पित्याला घराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झगडावे लागते. सर्वसाधारणपणे सिंगल मदर किंवा पित्याचे उत्पन्न दोघांच्या इतके असू शकत नाही. याचबरोबर आईवडिल एकत्र असल्यास मुलांच्या देखभालीसाठी अधिक वेळ, लक्ष आणि ऊर्जा देता येते. अशा स्थितीत मुले तंदुरुस्त, स्थैर्य असलेल्या आईवडिलांच्या घरात लहानाची मोठी व्हावीत हे आवश्यक आहे.
सामाजिकदृष्ट्या सिंगल मदर किंवा पित्याला दोषी ठरविण्याऐवजी त्यांना मदत करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यायला हवा. असे केल्याने लाखो मुलांच्या कल्याणात सुधारणा होणार आहे. याकरता सर्वांसाठी एक मजबूत समाजाची बांधणी अभिप्रेत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.