बेळगाव : राणेबेन्नूर येथे कर्नाटक राज्य अमॅच्युअर खो खो संघटना आयोजित 14 वर्षाखालील राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत मुलांच्या गटात बेळगाव संघाने सलग 3 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.
राणेबेन्नूर येथे 17 पासून सुरू झालेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरिय खो खो स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघाने धडाकेबाज सुरूवात केली. पहिल्या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने विजयनगर संघाचा 1 डाव व 2 गुणांनी, दुसऱया सामन्यात यादगिरी संघाचा 7 गुणानी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व सामन्यात बेळगाव संघाने हावेरी संघाचा 1 डाव व 7 गुणांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. बेळगाव जिल्हातर्फे श्रीशांत, गणेश, श्रीनाथ, प्रशांत, कुलवेश यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. या संघाला एन. आर. पाटील, एल. सी. लमाणी व अशोक बुडवी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मंगळवारी उपांत्य फेरीचा सामना बेळगाव जिल्हा वि. धारवाड यांच्यात होणार आहे.