साऊथ झोन स्केटींग स्पर्धा
बेळगाव : कलबुर्गी येथे घेण्यात आलेल्या साऊथ झोन रोलर स्केटींग स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंगपटूंनी दोन रौप्य, दोन कास्य पदक पटकावित यश संपादन केले. या स्पर्धेत 9 राज्यातील जवळपास 1400 हून अधिक स्केटींगपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत स्पीड स्केटिंग सौरभ साळुंखे 1 रौप्य, अवनीश कामन्नवर 1 रौप्य, अनघा जोशी 1 कास्य, सानवी इटगीकर 1 कास्य घेतले. त्यांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा यांचे मार्गदर्शन मिळते.