यंदा बेळगावात लवकरच हिवाळा सुरु झाला आहे असे म्हटल्यास काही हरकत नाही . दिवस आणि रात्रीही थंडीचे वातावरण जाणवत आहे . बेळगावात थंडीची लाट आली आहे , गेल्या आठवड्यापासूनच बेळगावकर थंडीने काकडले आहेत. लहान मुलांपासून वयोवृद्ध देखील थंडीने बेजार झाले आहेत. आज शहरात २४ डिग्री सेल्सियस तापमान आहे.
बेळगावला गरिबांचे महाबळेश्वर म्हंटले जाते. येथे कधी पासून पडेल आणि कधी ऊन याची कुणाला माहिती नसते. पण बेळगावला बाहेरून आलेले लोकांना मात्र थोडी जास्तच थंडी जाणवते. तसे पाहिल्यास डिसेंबर ते मार्च या दरम्यान हिवाळा असतो पण बेळगावात मात्र आता पासूनच शेकोटी पेटवताना दिसून येत आहे .घरातून कामानिमित्य बाहेर जाणारे विध्यार्थी , नौकरदारवर्ग , व्यापारी आदी गरम कपडे परिधान करूनच घरातून निघत आहेत. बाजारात ही गरम कपडे म्हणजेच स्वेटर्स, हॅण्डग्लउस, स्कार्प, आदी कपड्यांची विक्री जोरात सुरु आहे . शहराच्या कडोलकर गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार आदी ठिकाणच्या दुकानात आणि रस्त्या शेजारी देखील गरम कपडे विक्री करताना पाहायला मिळते.
हिवाळ्यात घशाचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता वाढते. म्हणून ताक आणि लिंबूवर्गीय फळं कधीही एकत्र खाऊ नये.हिवाळ्यात कोबी किंवा ब्रोकोली डाळींसोबत खाणे टाळावे.हिवाळ्यात हंगामी पालेभाज्यांसोबत फळं खाऊ नये. असे उपाय अवलंबल्यास हिवाळ्यात आरोग्यात बदल होणार नाही.युवापिढी या हंगामाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटनस्थळांना जात आहेत. तर या थंडीने वाचण्यासाठी चहाचा आस्वाद आणि गरमागरम भज्जी असे खाद्य पदार्थांचे सेवन करीत आहेत .