वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी निवड चाचणी स्पर्धेतील तिसऱया टप्प्यात महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत पश्चिम बंगालच्या मेहुली घोषने कर्नाटकाच्या तिलोत्तमा सेनचा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले.
सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत घोषने सेनचा 16-8 असा पराभव केला. या क्रीडाप्रकारात गुजरातच्या वलरिवनने कास्यपदक पटकाविले. कनिष्ठ महिलांच्या 10 मी. एअर रायफल निवड चाचणीच्या तिसऱया टप्यात हिमाचलप्रदेशच्या झिना खिटाने सुवर्णपदक पटकाविताना हरियाणाच्या रमिताचा 17-11 असा पराभव केला. युवा गटामध्ये हरियाणाच्या नॅन्सीने महाराष्ट्राच्या इशा अनिल टाकसाळेचा 16-4 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले.