एलॉन मस्क दुसऱया व अदानी तिसऱया स्थानी ः
वॉशिंग्टन
एलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती राहिलेले नाहीत. प्रेंच अब्जाधीश आणि लुई व्हिटॉनचे (एलव्हीएमएच) सीईओ बर्नार्ड अर्नाल्ट यांनी मस्क यांना मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे. मस्कच्या निव्वळ संपत्तीत घसरण होण्याचे कारण टेस्लाच्या समभागांची सतत घसरण आणि एलव्हीएमएचच्या समभागांच्या भावात झालेली वाढ हे ठरले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक आणि फोर्ब्स या दोन्हींमध्ये मस्क दुसऱया क्रमांकावर घसरले आहेत.
मस्कची एकूण संपत्ती 13.5 लाख कोटी रुपये
ब्लूमबर्गच्या मते, अर्नाल्टची एकूण संपत्ती आता 171 अब्ज डॉलर्स (सुमारे 14.12 लाख कोटी रुपये) आहे, तर एलॉन मस्कची एकूण संपत्ती केवळ 164 अब्ज डॉलर्स (सुमारे 13.5 लाख कोटी रुपये) आहे. भारतीय अब्जाधीश गौतम अदानी हे 125 अब्ज डॉलर (अंदाजे 10.32 लाख कोटी रुपये) संपत्तीसह तिस्रया स्थानावर आहेत.
यानंतर ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि बिल गेट्स आहेत. दोघांची एकूण संपत्ती 116 अब्ज डॉलर (सुमारे 9.5 लाख कोटी रुपये) आहे. मुकेश अंबानी 89.7 अब्ज डॉलर (अंदाजे रु. 7.41 लाख कोटी) सहाव्या स्थानावर आहेत.
अर्नाल्टची संपत्ती 15.58 लाख कोटींच्या घरात
फोर्ब्सनुसार, मस्कची एकूण संपत्ती 176.8 अब्ज डॉलर (सुमारे 14.60 लाख कोटी रुपये) आहे. श्रीमंत लोकांच्या यादीत दुसऱया क्रमांकावर येण्यापूर्वी त्यांची एकूण संपत्ती सुमारे 185 अब्ज डॉलर होती. त्याचवेळी, अर्नाल्टची एकूण संपत्ती 188.6 अब्ज डॉलर्स (सुमारे 15.58 लाख कोटी रुपये) झाली आहे.
अदानींची एकूण संपत्ती 134.2 अब्ज डॉलर (अंदाजे 11.08 लाख कोटी रुपये) आहे. मुकेश अंबानी 92.5 अब्ज डॉलरसह (अंदाजे 7.64 लाख कोटी रुपये) 8 व्या क्रमांकावर आहेत.
मस्क यांची नेटवर्थ का कमी झाली?
मस्कची कंपनी टेस्लाचा समभाग सोमवारी 6.87 डॉलर, किंवा 4.09 डॉलर व 160.95 डॉलरवर बंद झाला. शेअर्सच्या किमती घसरल्याने मस्कची नेटवर्थ घसरली आहे. त्याचवेळी, जर आपण या संपूर्ण वर्षाचा हिशोब केल्यास टेस्लाच्या हिस्स्यात 49.62 टक्के तूट राहिली आहे.
मस्क काय म्हणाले?
एका वापरकर्त्याने मस्कला ट्विट करून टेस्ला गुंतवणूकदारांना होणाऱया नुकसानाबद्दल विचारले. मस्कने निव्वळ वर्तमान मूल्याच्या गणितीय समीकरणासह प्रतिसाद दिला. असोसिएटेड प्रेसच्या मते, टेस्ला ही सर्वात मूल्यवान अमेरिकन कार कंपनी बनली आहे.
बर्नार्ड अर्नाल्ट कोण आहेत?
बर्नार्ड अर्नाल्ट यांना आधुनिक लक्झरी फॅशन उद्योगाचे गॉडफादर मानले जाते. ते जगातील सर्वात मोठे फॅशन ग्रुप लुईस व्हिटॉन मोएट हेन्नेसीचे संस्थापक, अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी आहेत. त्याचप्रमाणे सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत. बर्नार्ड अर्नाल्टचा समूह लुई व्हिटॉन हा त्याच्या जवळचा प्रतिस्पर्धी केरिंगपेक्षा बाजारभांडवलाच्या बाबतीत जवळजवळ चारपट मोठा आहे.