सीआयडी पोलिसांचे आवाहन : जनजागृतीसाठी केला व्हिडीओ व्हायरल
प्रतिनिधी /पणजी
बनावट फोन कॉल करून हजारो रुपयांना गंडा घालणारी एक टोळी सध्या कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. बनावट कॉलपासून सावध रहा असे आवाहन सीआयडी पोलिसांनी केले आहे. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सीआयडी पोलीस निरीक्षक नारयण चिमुलकर यांनी एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.
बनावट फोन कॉल करून सर्वसमान्य लोकांना विविध प्रकारची आमीशे दाखविली जातात व हजारो रुपयांना गंडावले जाते. अशाच प्रकारचा एक कॉल सध्या वाहन धारकांना नियमितपणे येत असल्याचे दिसून आले आहे. कॉल करणाऱयांनी आत्तापर्यंत अनेकांना लुटल्याचेही सिध्द झाले आहे. त्यामुळे अशा कॉलपासून सावध रहा असे निरीक्षक नारायण चिमुलकर यांनी सांगितले.
वाहन धारकंना एक अज्ञात व्यक्ती कॉल करते आणि केवळ 4500 रुपयात रोड साईड सर्वीस कार्ड देण्याचे आश्वसन देते. या योजने अंतर्गत ग्राहकाला एक कार्ड घरपोच केले जाईल, कार्ड मिळाल्यानंतर पैसे द्यावेत असेही ती व्यक्ती फोनवर सांगते. ही सेवा 15 वर्षे लागू होणार असून त्याठी 4500 रुपये खर्च करून रोड साईड सर्वीस कार्ड घ्या असे आवाहन ती व्यक्ती करीत असते. रोड साईड सर्वीस म्हणजे अचानक रस्त्यावर गाडी बंद पडल्यास किंवा गाडीबाबत अन्य कोणती समस्य निर्माण झाल्यास कार्ड धारकांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे आश्वासन ती व्यक्ती देत असते. मात्र सगळे बनावट असून केवळ पैसे लुटण्याचा प्रकार असल्याचे सीआयडी निरीक्षक नारायण चिमुलकर यांनी सांगितले.
अशा प्रकारच्या कोणत्याही बनावट फोन कॉलना बळी न पडता कुणालाही पैसे देत असताना त्याची सखोल चौकशी करा. तसेच कोणत्याही योजना घेण्यासाठी पैसे द्यायचे असल्यास पैसे रोख रक्कम न देता संबंधीत कंपनीच्या नावे धनादेश द्या असे आवाहन निरीक्षक चिमुलकर यांनी केले आहे. 4500 रुपयात रोड साईड सर्वीस अशी योजना कोणत्याही कार कंपनीची नसून हा प्रकार म्हणजे कार धारकांना गंडा घालण्याचा आहे. असेही ते म्हणाले. या योजने बाबत पोलासंनी तपास केला असता कार कंपनी कोणतीही अशी योजना देत नसल्याचे उघड झाले आहे. फसवेगीरी करणारे लोक एकदा कार्ड देऊन 4500 रुपये मिळाले की फोन कराणाऱया व्यक्तीचा फोन बंद होतो. त्याला संपर्क होत नाही व कार्ड घरी आणून देणारी व्यक्तीही गायब होते. पोलीस या प्रकरणाबाबत तपास करीत असून सर्व सामान्य लोकांनी बनावट फोन कॉलला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.