प्रतिनिधी /बेळगाव
गीता परिवार या जगभरात कार्यरत असणाऱया संस्थेच्या बेळगाव शाखेतर्फे माहेश्वरी भवन येथे श्री भगवदगीता श्लोकपठण व बाल सुलभ शब्दात गीतेचे विवेचन हे वर्ग सुरू आहेत. यामध्ये प्रीती चिंडक या भगवदगीतेचे विवेचन करून श्लोकपठण करून घेतात. श्रुती मोदानी योगाभ्यास शिकवितात तर शिल्पा झंवर मुलांना हस्तकला आणि खेळ शिकवितात.
या शिवाय विविध सणावारांचे अर्थ व त्याची कारणे सांगितली जातात. दर महिन्याच्या दुसऱया व चौथ्या रविवारी सकाळी 10 ते 11.30 यावेळेत हे वर्ग होतात. त्यांना अध्यक्षा स्वाती झंवर, सचिव अर्पिता चिंडक, उपाध्यक्षा प्रीती चिंडक, खजिनदार ज्योती राठी, सदस्या अर्चना, अमृता व दुर्गा बजाज, श्रुती मोदानी, अर्चना हेडा, डिंपल चिंडक यांचे सहकार्य लाभले.