खानापूर : तालुक्यातील हेब्बाळ येथे शनिवार दि. 3 सप्टेंबर रोजी अश्वारुढ शिवपुतळय़ाची प्रतिष्ठापना करण्यात आली. याचा लोकार्पण सोहळाही नुकताच पार पडला. या निमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांचे मंगळवार दि. 6 रोजी हेब्बाळ येथील लक्ष्मी मंदिराच्या पटांगणात सायंकाळी 4 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
तरी तालुक्यातील प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका दक्षिण विभाग प्रमुख रत्नाकर निलजकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.