बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील सुळगा (उचगांव) येथील ब्रह्मलिंग माध्यमिक शाळेला मलेनाड विकास योजनेच्या ५० लाख रुपये अनुदानातून २ नूतन वर्ग खोल्या निर्माण कार्याला आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव व काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी चालना दिली.
याप्रसंगी बोलताना युवा नेते मृणाल हेब्बाळकर म्हणाले आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या आमदारकीच्या अवधीत केवळ रस्ता, गटार विकासाला प्राधान्य न देता पुरेसे अनुदान आणून ग्रामीण क्षेत्रातील शासकीय शाळांना स्मार्ट बनविण्यात आले आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांना मूळ सुविधा पुरविण्यात आल्या आहेत . यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील शहरीय भागात मिळणारी सुविधा मिळत आहे. याद्वारे शैक्षणिक उन्नती साध्य होताना दिसत आहे.
याप्रसंगी यल्लाप्पा कलकांबकर, बागन्ना नरोटी, परशु तोरे, देवप्पा पाटील, अशोक पाटील, प्रकाश पाटील, कृष्णा पाटील, रामचंद्र हुलजी व शालेय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.