निपाणी, प्रतिनिधी/ अमर गुरव
सामाजिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने निपाणीत तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निपाणीत विराट मूकमोर्चा काढला. सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. जुना मोटर स्टँडमार्गे तहसीलदार कार्यालयात आल्यानंतर मोर्चाची समाप्ती झाली.
यावेळी सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या व्यक्तींवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन डीवायएसपी बसवराज यलीगार यांना देण्यात आले. यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.