ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाहीर सभा झाली. या सभेपूर्वी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मालेगाव शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. दरम्यान, महात्मा फुले चौकात लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधलं होतं. या बॅनरवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या भाषणात केलेल्या एका विधानाचा उल्लेख होता. “जसं मला सांभाळलं, तसं माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा…” असं भावनिक आवाहन ठाकरे गटाकडून लोकांना करण्यात आलं होतं.
याच बॅनरवरुन भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “एकाने 60 पार केली, एकाने 30…तरीही सांभाळा? या वयासाठी पाळणाघरं आहेत?” असं ट्विट करत भातखळकर यांनी ठाकरेंवर टीकास्त्र डागले.
अधिक वाचा : मुरलीधर मोहोळ यांच्या नावे मागितली 3 कोटींची खंडणी, दोघांवर गुन्हा