ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आ. मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसबा विधानसभेची तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. आज भाजपने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत नारायण रासने यांना तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार लढत होणार आहे.