सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या घेणार भेटी
मोरजी : मांद्रे मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे संपर्क ते समर्थन अभियानास प्रारंभ झाला आहे. मतदारसंघातील सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या 50 जणांशी संपर्क साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अभियानात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी आमदार दयानंद सोपटे, मांद्रे भाजपा गटाध्यक्ष मधू परब, सचिव रवी गोवेकर, अनंत गडेकर, बाळा नाईक धीरज मांद्रेकर, गोविंद आसगावकर, पांडुरंग पेडणेकर, दत्ताराम ठाकूर यांचा समावेश होता.संपर्क ते समर्थन अभियानात मांद्रे पंचायत सदस्य महेश कोनाडकर, प्रशांत नाईक, माजी सरपंच प्रिया कोनाडकर, राघोबा गावडे, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांजरेकर, श्रीमती श्रीधर मांजरेकर, दादा पेडणेकर, रमेश पोखरे, एन.जे.नाईक, मच्छिंद्र पेडणेकर, विजेश मांद्रेकर, अजित मंद्रेकर यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी संपर्क साधला. या अभियाना अंतर्गत त्यांनी भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणे समजावून सांगितली. यावेळी त्यांनी मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना केंद्र सरकार व गोवा सरकारच्या उपलब्धीची कार्यपुस्तिका वितरीत करून भाजपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. हे अभियान 10 जूनपर्यंत चालणार असून त्यात 50 सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकाच्या घरी भेट देऊन संपर्क करणार असल्याचे सांगण्यात आले.