काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांचा आरोप
पणजी : भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी महिला आमदारांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात नकार दिल्याने त्यांचा पक्ष महिलांच्या सशक्तीकरणासाठी खऱ्या अर्थाने कटिबद्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या तीन महिला आमदारांचा पुऊषप्रधान मंत्रिमंडळात समावेश करण्याची सध्याची वेळ योग्य नाही का? असा प्रŽ काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला आहे. भाजप एका कुटुंबाला दोन मंत्रिपद देऊ शकत नाही, या तानवडे यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना चोडणकर म्हणाले की तानावडे यांचा महिला आमदारांच्या क्षमतेवर विश्वास असेल, तर विश्वजित राणे आणि बाबूश मोन्सेरात यांसारख्या पुऊष मंत्र्यांनी स्वेच्छेने मंत्रीपद सोडले पाहिजे आणि त्यांच्या पत्नींना त्याचा लाभ दिला पाहिजे. डॉ प्रमोद सावंत मंत्री न होता मुख्यमंत्री होऊ शकतात तर पहिल्यांदा आमदार झालेल्या महिला मंत्री का होऊ शकत नाहीत? असा प्रŽ चोडणकर यांनी केला. महिला आरक्षण आणि समानतेबाबत तत्परता दाखवली असती, तर त्यांनी महिला आमदारांना मंत्रीपद भूषवण्याची संधी दिली असती आणि महिला आरक्षणाची अंमलबजावणी केली असती, असेही ते म्हणाले. काँग्रेस पक्षाने महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आपण अभिमानाने सांगतो की निर्मला सावंत यांना त्यांच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. स्त्री आणि पुऊष दोघांनाही समान आदराने वागवत आम्ही समानतेचे तत्त्व कायम ठेवले आहे. याउलट, विशेषत: एलपीजीच्या किमती वाढल्यानंतरही भाजप महिलांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेला त्यांच्या फसव्या ‘जुमल्यां’ची चांगलीच जाणीव आहे आणि ते अशा डावपेचांना बळी पडणार नाहीत, असे चोडणकर म्हणाले.