राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी लोकसभेत महिला प्रतिनिधीत्व विधेयकाच्या चर्चेदरम्यान बोलताना, भाजपचे महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या भेदभावपूर्ण टिप्पणीची आठवण करून देताना भाजपची हीच मानसिकता असल्याची टिप्पणी केली आहे.
आज नविन सभागृहातील सदस्यांना संबोधित करताना, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या INDIA आघाडीवर केलेल्या आरोपांना उत्तर दिले. या आघाडीने महिलांबद्दल अपमानास्पद बोलणाऱ्या लोकांची बाजू घेतला असल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला होता.
यावर प्रतिवाद करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी नेहमी सांगते की महिलांप्रमाणेच पुरुषही कुटुंबात तेवढेच महत्त्वाचे असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजीव गांधी, शरद पवार या पुरुषांचा माझ्यावर प्रभाव राहिला आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पंचायतींमध्ये ३३ टक्के आरक्षण लागू झालं”, असं सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या.
यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेत म्हणाल्या, “महाराष्ट्रात भाजपचे एक प्रमुख होते कि मी घरी जाऊन स्वयंपाक करायला हवा आणि त्यांनी हे मला रेकॉर्डवर सांगितले होते. भाजप नेते महिला आमदारांवर वैयक्तिक टिप्पणी करतात, यावरून त्यांची मानसिकता काय आहे हे दिसून येते. मी फक्त एक वैयक्तिक अनुभव उद्धृत करत आहे.” अशी टिका केली.