पश्चिम बंगालचे माजी गव्हर्नर
वृत्तसंस्था/ प्रयागराज
पश्चिम बंगालचे माजी गव्हर्नर, उत्तरप्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष तसेच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष पंडित केशरीनाथ त्रिपाठी यांचे रविवारी निधन झालेअ ाहे. त्रिपाठी हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. प्रयागराज येथील निवासस्थानी त्यांनी पहाटे 5 वाजता अखेरचा श्वास घेतला आहे. त्रिपाठी यांच्यावर रविवारीच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
88 वर्षीय केशरीनाथ त्रिपाठी हे अलाहाबाद उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील तसेच घटनातज्ञ होते. 2004 मध्ये त्यानी जौनपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्रिपाठी हे 8 डिसेंबर रोजी बाथरुममध्ये पाय घसरून पडले होते. 30 डिसेंबर रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्रिपाठी यांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.