जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
हिंदू या शब्दाबद्दल आमदार सतीश जारकीहोळी यांनी जे वक्तव्य केले आहे, त्या विरोधात भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. निपाणी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये आमदार सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्द पर्शियन असल्याचे सांगितले होते. त्यानंतर हिंदूंमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर भाजपने आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
हिंदू हा शब्द पर्शियन आहे. त्याचा अर्थ घाणेरडा असल्याचे त्यांनी त्या कार्यक्रमात सांगितले. त्यानंतर त्या शब्दावरून जिल्हय़ामध्ये खळबळ उडाली होती. भाजपने मात्र त्यांच्याविरोधात आंदोलन करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी संपूर्ण हिंदुंचा अवमान केला आहे, असेही यावेळी भाजपने म्हटले आहे.
चन्नम्मा सर्कल येथे साखळी आंदोलन छेडून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.