सावंतवाडी प्रतिनिधी
दोडामार्ग येथून निघालेल्या शिव शौर्य यात्रेचे जंगी स्वागत सावंतवाडी शहरात करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात आणि आतिषबाजीत सावंतवाडीकरांनी व भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांनी गांधी चौकात स्वागत केले. यावेळी भाजपचे माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब ,मनोज नाईक, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवींद्र मडगावकर, भाजपच्या सावंतवाडी शहर महिला अध्यक्ष मोहिनी मडगावकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे ,आनंद नेवगी ,दिलीप भालेकर ,दिपाली भालेकर ,चंद्रकांत जाधव ,परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, बाळू देसाई ,मानसी धुरी, श्री पेडणेकर, यात्राप्रमुख तथा बजरंग दल संयोजक गौरव शंकरदास ,धर्मप्रसार प्रमुख सुनील सावंत ,कोषाध्यक्ष रवी सातावडेकर, सहपुरुषाध्यक्ष विनायक रांगणेकर, किशोर चिटणीस ,विशाखा रांगणेकर, सौ वझे आदी उपस्थित होते. यावेळी जय शिवाजी जय भवानीचा गजरही करण्यात आला. सावंतवाडी शहरात टोपीवाला तांत्रिक महाविद्यालय ,पोलीस लाईन येथून ही यात्रा संपूर्ण सावंतवाडी बाजारपेठेतून निघाली त्यानंतर तेथून यात्रा मार्गस्थ होत शिरोडा नाका ,मिलाग्रीस हायस्कूल, जयप्रकाश चौक, गांधी चौक ,रामेश्वर प्लाझा, भोसले उद्यान ,राजवाडा अशी निघाली. यावेळी शिव शौर्य यात्रेने सावंतवाडी नगरी शिवमय झाली होती.