विस्तारक’ पाठवून करणार मतदारसंघांचा अभ्यास : सर्व 543 जागांसाठी विशेष आराखडा तयार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) सातत्याने रणनीती आखत आहे. पक्षाच्या हायकमांडकडून सातत्याने वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या जात आहेत. आता भाजपने देशभरातील सर्व 543 लोकसभेत आपले विस्तारक पाठवण्याची योजना तयार केली आहे. यासाठी उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यीय टीम तयार करण्यात आली असून ते केंद्रीय स्तरावर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांना अहवाल देतील. हे विस्तारक प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन पक्षाची विजयी रणनीती तयार करतील.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप देशभरातील सर्व लोकसभा जागांवर विस्तारक पाठवणार आहे. भाजप नोव्हेंबरपर्यंत देशातील सर्व 543 लोकसभा जागांवर विस्तारक पाठवण्याच्या योजनेवर काम करत आहे. हे विस्तारक राज्यातील संघटनात्मक नेत्यांसोबत चर्चा करून मतदारसंघात पक्षाच्या विजयाची रणनीती तयार करतील.
विस्तारक-समन्वयक टीम
या विस्तारकांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. या विस्तारकांच्या समन्वयासाठी राज्यस्तरावर समन्वयकांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. सर्व लोकसभा मतदारसंघात पाठवलेले विस्तारक राज्य समन्वयकांच्या मदतीने अहवाल तयार करून तो राष्ट्रीय नेतृत्वाला सादर करतील. सध्या भाजपने केंद्रीय पातळीवर 10 सदस्यांची टीम तयार केली आहे. उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांना विस्तारक योजनेचे समन्वयक, तर बिहारचे संघटनेचे महासचिव भिखू भाई दलसानिया आणि दिल्ली भाजप नेते राजकुमार शर्मा यांना सहसंयोजक बनवण्यात आले आहे.
कमकुवत जागांवर विशेष लक्ष
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल केंद्रीय स्तरावर या टीमच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम करणार आहेत. विस्तारकांना पाठवण्यापूर्वी सर्व विस्तारकांना प्रशिक्षण दिले जाईल. सदर टीम तयार करण्याची प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. आत्तापर्यंत, 160 कमकुवत जागांसह देशातील 250 हून अधिक जागांवर विस्तारक पाठवले गेले आहेत.
पक्षाध्यक्षांच्या विचारमंथन बैठका सुरूच
भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी न•ा यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. चालू वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक होणाऱ्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणामधील पक्षाचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत प्रभारी सरचिटणीसांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना आपापल्या राज्यांमध्ये चालवल्या जाणाऱ्या जनआशीर्वाद यात्रा आणि जनआक्रोश यात्रेबाबत प्रेझेंटेशन दिले. तसेच पंतप्रधान मोदींसह सर्व स्टार प्रचारकांची यादी आणि वेळेसंबंधी प्राथमिक नियोजनही करण्यात आले. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात झालेल्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांच्यासह संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष, सहसंघटन सरचिटणीस व्ही. सतीश, पक्षाचे सरचिटणीस अऊण सिंग, सुनील बन्सल, संजय बंडी, दुष्यंत गौतम, विनोद तावडे आदी उपस्थित होते.