Black panther terror in Kunkeri since two months
मुक्त संचारामुळे ग्रामस्थांत भितीचे वातावरण
कुणकेरी गावात गेल्या दोन महिन्यांपासून दुर्मिळ ब्लॅक पँथर तळ ठोकून असून गावातील सात ते आठ कुत्र्यांचा त्याने पडशा पाडला आहे. दोन महिन्यांपासून रात्रीच्या वेळी मुक्त संचार सुरू असलेल्या या ब्लॅक पँथरचे सोमवारी रात्री पुन्हा कुणकेरी रमाईनगर परिसरात दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
कुणकेरी येथील सामाजिक युवा कार्यकर्ते गुरु परब यांच्यासह गावातील अनेकांनी या ब्लॅक पॅथरला याची देही याची डोळा पाहिला आहे. सुमारे चार फूट लांबीच्या या ब्लॅक पॅथरची तीन फूट उंची असल्याचे गुरु परब यांनी सांगितले. दरम्यान भाजपचे जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनाही महिन्यापूर्वी कुणकेरी येथे रात्रीच्या वेळी जात असताना त्यांच्याही दृष्टीस पडला होता.
ओटवणे / प्रतिनिधी