फलक-रोपटी उभी करून दिला संदेश
प्रतिनिधी / बेळगाव
शहरामधील विविध चौकांमध्ये कचरा फेकला जातो. त्यामुळे कचऱ्याचे ढीग पडून राहतात. त्या ठिकाणी कचरा टाकू नये यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. ब्लॅक स्पॉट निर्मूलन करून शहर कचरामुक्त करण्याकडे अधिक लक्ष दिले असून गरुरूवारी वॉर्ड क्रमांक 56 मधील कुलकर्णी गल्ली, जुने बेळगाव परिसरातील ब्लॅकस्पॉटजवळ फलक उभा करून रोपट्यांच्या कुंड्यादेखील ठेवल्या आहेत.