कसबा बीड/प्रतिनिधी
देशाच्या विकासासाठी प्रमुख दळणवळण म्हणून रस्ता महामार्ग याकडे केंद्र व राज्य शासनाने अधिक गांभीर्याने लक्ष दिले आहे.यामध्ये सहा पदरीकरण,चौपदरीकरण व रिंग रोड असे सर्व रस्ते मार्गांचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. कोल्हापूर फुलेवाडी रिंग रोड येथून गंगाई लाॅन ते महे यादरम्यान असणारा 194 अ राज्यमार्ग गेले अनेक दिवस शेतकऱ्यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे बंद होता. सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी,पाडळी खुर्द येथील लोकप्रतिनिधी नरसिंह समूहाचे चेअरमन जी डी पाटील, व्हाईस चेअरमन बाळासो पाटील, व या राज्य मार्गावर असणारे शेतकरी यांच्या संयुक्त चर्चेतून आज गंगाई लॉन ते महे असणारा राज्य मार्ग करण्यासाठी मोकळा करण्यात आला.
पहा VIDEO >>> पाडळी खुर्द ते महेफाटा राज्यमार्गातील अडथळा दूर
कोल्हापूरला जाण्यासाठी महे पासून आरळेपर्यंत जाणारे सर्व वाहतूकदार व वाहनधारक यांना कोगे बालिंगा मार्गे जावे लागत आहे. पावसाळ्यामध्ये महापुराची समस्या निर्माण झाली की कोल्हापूरला जाण्यासाठी संपर्क तुटला जातो.फुलेवाडी रिंग रोड ते महे फाटा हा राज्य महामार्ग गेली अनेक वर्षे मंजूर झाला होता.शेतकरी व त्यांच्या असणाऱ्या समस्या यांच्या माध्यमातून हा राज्य मार्ग पुण्यामध्ये अडथळा निर्माण होतो होता.मला आज सुटल्यामुळे जवळपास 25 गावांचा वाहतुकीचा प्रश्न सुटला असे म्हटले तरी वावगे होणार नाही. 25 गावातील लोकांना जाण्यासाठी जवळपास पाच ते सात किलोमीटर अंतर कमी प्रवास होईल यामधून त्यांचा वेळ व होणारा खर्च काही अंशी कमी होईल.जवळपास पंधरा मिनिटे वेळ वाचेल तर वार्षिक टू व्हीलर विचार केला तर 550 रुपये चे पेट्रोल वाचेल.यामधून सर्वसामान्य वाहनधारकांना वेळेत पोहोचता येईल व प्रवास सुखकर होईल.हा होणारा रोड जवळपास 80 फूट रुंदीचा 60 फुटी रोड होईल असे सद्यस्थितीला चर्चेतून दिसून येत आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी, नरसिंह विकास सेवा संस्थेचे चेअरमन जी.डी. पाटील, व्हाईस चेअरमन बाळासो पाटील, तानाजी तानुकडे, सचिन सोहनी, सुनिल तानुकडे,कुंडलिक तानुकडे,बळवंत पाटील, राजेंद्र पाटील, सागर तानुकडे आदी शेतकरी उपस्थित होते.